हतनुर जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पक्षी गणना

चातक निसर्ग संवर्धन संस्थेचा उपक्रम ; पक्षीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

वरणगाव – भुसावळ तालुक्यात निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या हतनुर धरण जलाशयावर रविवार दि २५ रोजी आशीयाई पाणपक्षी ही उत्तर महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पक्षी गणना होणार असुन हा उपक्रम चातक निसर्ग सवर्धन संस्थेच्या आणि वनविभाग जळगाव मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आली आहे या भव्य उपक्रमात परिसरातील पक्षी व निसर्ग प्रेमीना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साला बादा प्रमाणे चातक निसर्ग संवर्धन संस्था वरणगाव हतनुर धरण जलाशयावर विविध देशातून स्थलांतर करून येणारे पानपक्षी व स्थानिक पक्षाचे प्रमुख आश्रयस्थान मानले जाते दरवर्षी देश विदेशातून हजारो किलोमिटरचा प्रवास करून विविध दुर्मिळ व वैशिष्ठ्यपुर्ण पक्षी जानेवारी महिन्यात हतनुर जलाशयावर दाखल होत असतात या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची संख्या , त्यांची प्रजातीची नोंद व त्यांचे वर्तन व अधिवास याबाबत शास्त्रीय माहीती संकलित करण्याची हा गणना महत्वाची ठरणार आहे .
या उपक्रमामुळे जैवविविधतेचे संवर्धन , पर्यावरणीय जागरुता तसेच भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार आहे, तसेच या प्रदेशाला रामसर स्थळ घोषित करण्यासाठी मदत होणार आहे, चातक निसर्ग संवर्धन संस्था यांनी निसर्गप्रेमी , पक्षीप्रेमी , छायाचित्रकारानी या मोठ्या संस्थेने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे तर पक्षिनिरीक्षणाची आवड असलेल्यांसाठी हि एक दुर्मिळ संधी उपलब्ध असून निसर्गाशी नाते दृढ करण्याचा हा उपक्रम सर्वासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
Comments (0)
Add Comment