धावत्या रेल्वेच्या धडकेत अज्ञात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळील रेल्वे स्थानकाच्या परिसरात धावत्या रेल्वेचा धक्का लागून अंदाजे ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद गुरुवारी (२२ जानेवारी) दुपारी ४ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खांब क्रमांक ३३१ जवळ ही घटना घडली. धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का बसल्याने संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गेटमन प्रवीण चौधरी यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याला दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी कोणतीही कागदपत्रे अथवा ओळखीची माहिती आढळून आलेली नाही. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अजय मालचे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
Comments (0)
Add Comment