सोनं-चांदीचे भाव गगनाला: जळगाव सराफ बाजारात ऐतिहासिक उच्चांक

जळगाव सोने आणि चांदीच्या दरांनी दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत गुरुवारी सकाळी बाजार उघडताच जळगावच्या सराफ बाजारात ऐतिहासिक उसळी घेतली. सोन्याचा दर थेट तोळ्याला 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून, चांदीनेही चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

या दरवाढीमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची चिंता वाढली आहे. विशेषतः लग्नाची तयारी करणाऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार असल्याचे चित्र आहे.

जागतिक बाजारातील वाढती चलनवाढ, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि मागणी-पुरवठ्यातील असमतोल ही दरवाढीची प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांमधील गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून वळत असल्याचा परिणामही भाववाढीवर होत आहे.

सोने आणि चांदीचे दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्याने सध्या खरेदीदारांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा !
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • राज्य
Comments (0)
Add Comment