DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

धक्कादायक! ईव्हीएम मशीनची ने-आण करणाऱ्या बसच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल

कोपरगाव (अहिल्यानगर) : राज्यात विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाचे वेध लागले आहेत. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशीनची ने- आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुकिंग करण्यात आल्या होत्या. याच बसमध्ये सीटच्या खाली नोटांचे बंडल आढळून आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ही घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव आगाराची बस असून दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन गेली होती. त्यानंतर काल याच बसने कोपरगाव- वैजापूर- कोपरगाव अशा फेऱ्या मारल्या आहेत. दरम्यान काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना विद्यार्थ्याला बसच्या शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल आढळून आले.

एसटी बसच्या सीटखाली ५०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडले आहे. तब्बल ८६ हजारांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. एवढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपास सुरु असून त्यामधून निष्पन्न होणार आहे. मात्र प्रामाणिकपणा दाखवत विद्यार्थ्यांनी वाहकाकडे ही रक्कम सुपूर्द केली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.