अमळनेर मतदारसंघातील तीन सिंचन बंधारे दुरुस्तीसाठी 81 लाखांचा

भिलाली सह धानोरा व पातोंडा सिंचन बांधचा समावेश,आ.अनिल पाटलांचे प्रयत्न

अमळनेर-अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नादुरुस्त झालेला भिलाली येथील बोरी नदीवरील केटीवेअर तसेच धानोरा येथील सिमेंट नाला बांध आणि पातोंडा येथील गॅंबियन बांध यांच्या दुरुस्तीसाठी आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी 81 लाखांचा निधी मंजूर झाल्याने दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,मृद जलसंधारण विभाग नाशिक येथील 111 दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मृदू जलसंधारण विभागाचा शासन निर्णय 27 जानेवारी रोजी झाला असून यात अमळनेर मतदारसंघातील तीन कामांचा समावेश झाला आहे,त्यात अत्यंत आवश्यक असलेल्या पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील भिलाली येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 49.9 लक्ष,धानोरा येथे माळण नदीवर असलेल्या सिमेंट नाला बांधच्या दुरुस्तीसाठी 30.31 लक्ष तर पातोंडा येथील गॅंबियन बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 1.54 लक्ष याप्रमाणे निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.यात प्रामुख्याने भिलाली येथील बोरी नदीवरील केटीवेअर ची रायझिंग वॉल वाहून गेल्याने यंदा चांगला पाऊस होऊनही या बंधाऱ्यात पाणी साचले नाही,परिणामी भिलाली सह परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता,यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन मृदू व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा केल्याने या केटीवेअरच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.आमदारांनी दुरुस्तीचा मोठा प्रश्न मार्गी लावल्याने याठिकाणी असलेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना जिवंत होणार असून पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याने शेतकरी बांधवात समाधान व्यक्त होत आहे.यासोबतच धानोरा येथील माळण नदीवर असलेला सिमेंट नाला बांधच्या शेजारील मातीचा बांध वाहून गेल्याने याठिकाणी पाणी न थांबता पुढील आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता होती त्यामुळे संभाव्य धोका आणि बंधाऱ्याची गरज लक्षात घेता आमदारांनी दुरुस्तीसाठी निधी मिळविला असून पातोंडा येथील गॅंबियन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचाही प्रश्न सुटला आहे.या तिन्ही गावांच्या मंजुरी बद्दल ग्रामस्थांनी आ अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत,तर आमदारांनी ही कामे मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,मृदू व जलसंधारण विभागाचे मंत्री शंकरराव गडाख,राज्यमंत्री दत्ता मामा भरणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

त्या 12 कोटीच्या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यासाठी आमदारांचे प्रयत्न अमळनेर मतदारसंघात भिलाली,फाफोरे,अंबापिंप्री,शेळावे,इंधवे,रामेश्वर यासह एकूण 12,13 गावांमध्ये 12 कोटींचे सिमेंट बंधारे मंजूर झाले असताना सदर बंधाऱ्याचे काम शासनाने आहे त्या स्थितीत कोविड कालावधीत आर्थिक अडचणीमुळे स्थगित केले होते,मात्र अमळनेर मतदारसंघ सतत अवर्षणप्रवण असल्याने व पाण्याचा दुसरा कोणता सोर्स नसल्याने ही स्थगिती उठवून तातडीने काम सुरू करावे या मागणीचा पाठपुरावा आमदार अनिल पाटलांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, मृदू व जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे केला असून लवकरच स्थगिती उठवली जाऊन वरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी विशेष फायदा होऊ शकेल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment