पाचोरा :- ता.अंतुर्ली येथे विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपुष्टात आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून . सकाळी ७:००वा उघडकीस आलेल्या या घटनेमागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आईचा जिव वाचवण्यासाठी विहीरीत उडी घेतलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. प्रतिभा पंढरीनाथ पाटील वय (45) व नितीन पंढरीनाथ पाटील असे मृत असे आई मुलाचे नाव आहे.
पोहता येणा-या तरुणांनी दोघांचे शव विहीरीतून बाहेर काढले असून ते शवविच्छेदनकामी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.