आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकमधील श्रमित सेनेचे अजय बागूल यांच्याविरोधात पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप

नाशिक:

श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याच्या रागातून राजलक्ष्मी पिल्ले या महिलेने थेट पोलीस आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री शहराच्या दौऱ्यावर असतानाच ही घटना घडल्याने पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शिवसेना नेते सुनील बागूल यांचे बंधू श्रमिक सेेनेचे पदाधिकारी अजय बागूल यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी संबंधित महिला अंबड आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. मात्र, त्या ठिकाणी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप महिलेने केला. पोलीस आयुक्तालयासमोर दुपारच्या सुमारास आलेल्या या महिलेने अचानक स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेतला. यावेळी महिलेचा पतीदेखील सोबत होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा महिलेचा आरोप आहे. दरम्यान, अजय बागूल यांच्यावर तडीपारीचीही कारवाई झाली होती. मात्र, राजकीय दबावानंतर ती मागे घेतली गेली.

बातमी शेअर करा !
नाशिक आयुक्तालयनाशिक जिल्हा
Comments (0)
Add Comment