उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

जळगाव प्रतिनिधी – उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी सर्वप्रथम कुलभूषण यांच्या गाडीवर हल्ला केला त्यानंतर ते स्वतःला वाचवून पिंप्राळा येथील घरी गेले तेव्हा कुलभूषण पाटील यांच्या घराच्या दिशेने गोळीबार केला. यात ते सुदैवाने बचावले असून ते रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment