एक कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य

मुंबई : देशात सर्वाधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

सोमवारपर्यंत महाराष्ट्रात तब्बल १,००,९९,५२४ व्यक्तींचे करोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८.५ कोटी वयस्क लोकसंख्येपैंकी १२ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर २५ टक्के नागरिकांना करोना लसीचा कमीत कमी एक डोस मिळाला आहे. भारतात एव्हाना नऊ कोटींहून अधिक लोकांचे करोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. यातील एक कोटी नागरिक केवळ महाराष्ट्रातील आहेत.

राज्यात सर्वाधिक ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील ७४.२८ लाख नागरिकांना करोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर १.०१ कोटी नागरिकांना कमीत कमी एक डोस देण्यात आला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील ४५ लाख नागरिकांना दोन्ही डोस तर ९९.५६ लाख नागरिकांना करोना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. राज्यात ८.९७ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना लसीचे दोन्ही डोस तर ३.८८ लाख कर्मचाऱ्यांना एक डोस मिळाला आहे. राज्यात ११ लाख करोना योद्ध्यांना दोन्ही डोस मिळालेत तर १० लाख योद्ध्यांनी आपला करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्थात ५९.१२ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment