खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष अजय चौधरी यांच्या मुलीच्या वाढदिवसा निमित्त जामनेर मोयखेडा दिगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपांचा कार्यक्रम संपन्न

जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे खान्देश तेली समाज मंडळ जमनेरचे अध्यक्ष श्री अजयभाऊ चौधरी यांची कन्या कु ईशिकाचे वाढदिवसाचे निमित्ताने मोयखेडा दिगर येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले आधी मुलगी जन्माला आली तर दुःख वाटायचे परंतू आता हळू हळू सामाजीक दुष्टिकोन बदलत जावून आज मुलींचे जन्माचे व वाढदिवसाचे उत्सव होतांना दिसत आहे त्याच अनुशंगाने अजय चौधरी यांनी एक आगळा वेगळा व समाज परिवर्तन व प्रबोध पर कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांना साथ देणाऱ्या जामनेरच्या सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी यांचे अभिनंदन होत आहे या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज चौधरी तसेच चोपडा तालुका अध्यक्ष श्री प्रकाशदादा चौधरी उपस्थित होते यावेळी खान्देश तेली समाज मंडळ जामनेर येथील सर्व पदाधिकारी स्वाती ताई चौधरी प्रणालीताई चौधरी निलेश चौधरी रामेश्वर पाटील वासुदेव चौ विलास चौ संतोष भोलाने कल्पेश चौ मुकेश जाधव दत्तात्रय पाटील तेजस चौ दिपक भोलाने निखिल भोलाणे गणेश चौ बुलढाणा हर्षल चौ त्याचप्रमाणे गावातील डॉ कैलास चौ दिनकर चौ सुनील चौ प्रकाश काळे रतन चौ वासुदेव अहिर कार श्रीकiत चौ तसेच शाळेतील शिक्षक भास्कर पाटील अजय कानडे नाईकसर गिरासे सर वराडेसर नेवत सर अतुल चौ व ईश्वर सैतवाल विध्यार्थी हजर होते यावेळेस श्री प्रकाशदादा चौधरी यांनी खान्देश तेली समाज मंडळाचा परीचय व सामाजीक कार्याची माहीती देवून अतिशय मोलाचे व स्फुर्ती देणारे मार्गदर्शन करून जामनेरच्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले त्याचप्रमाणे नाईकसर यांनी देखील मार्गदर्शन करून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले शेवटी कानडे सरांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर मंडळाच्या वतीने नियोजीत वर वधु परीचय मेळाव्याचे प्रकाशन व वाटप मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थिती त करण्यात आले.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment