गणपती विसर्जनामधे धक्का-बुक्की होता कामा नये याची काळजी घ्या व नियमांचे पालन करा-पो .नि. प्रताप इंगळे साहेब

फत्तेपूर/प्रतिनिधी -सुनिल शेजूळे श्री गणपतीची स्थापना शांततेत पार पाडण्यात यावी यासाठी कुठलाही अनुसूचित प्रकार घडता कामा नये.येत्या काळात गणपती विसर्जन करताना, शांततेच्या मार्गाचा अवलंबन करा जेणेकरून वादग्रस्त होणार नाही याची काळजीपूर्वक जाणीव घ्या, असे यावेळी पहूर पोलीस स्टेशन चे पो.नि प्रताप इंगळे साहेब यांनी फत्तेपूर येथे आयोजित झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत महापुरुषांनी व लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य पूर्वक ज्या हेतूने गणपती उत्साह ला सुरुवात केली यांची जाणीव ठेवा आणि नियमाचे पालनात करून कायद्याच्या चौकटीत सर्वच गणेश उत्सव पार पाडा अन्यथा आम्हाला कायद्याचा परदा उघडता येईल याची नोंद घ्या .असे अतीमोलाचे मार्गदर्शन पहूर पो. नि .प्रताप इंगळे साहेबांनी केले. याप्रसंगी तंटामुक्ती: अध्यक्ष बबलू भंसाळी, माजी सरपंच शिवाप्पा गोडांबे ,माजी उपसरपंच सलीम पटेल ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र पाटील,पत्रकार सुनिल शेजूळे, सरपंच पती पुना शेजूळे, पत्रकार सुरेश सोनार, रमेश तेली,शेखर शेख,समाधान हुबळ,अभय सिंग राजपूत,आदी पदाधिकारी व पंच क्रोशीतील प्रतिष्ठान नागरिक याठिकाणी उपस्थित होते. उपस्थित सूत्र संचालन करतांना सूरेश सोंनार यांनी केले असता यशस्वीतेसाठी हे.काॅ.किरण शिंपी, प्रविण चौधरी,पो.ना.दिनेश मारवडकर, पो.का.कोकणी राहूल जोहरे, आणि होमगार्ड यांनी या बैठकीत परिश्रम घेतले आहे.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment