गिरीश महाजन राज्यातील ग्रामविकासाचा आलेख उंचावतील – प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे

 

 

जामनेर | शांताराम झाल्टे,उपसंपादक   

महाराष्ट्र राज्याचे नूतन ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन यांना ग्रामीण भागातील  सर्व प्रश्नांची जाण असून..  एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते जनहिताच्या निर्णयाला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले आहे आणि राज्यातील सरपंच बांधवां विषयी विशेष  प्रेम असणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकासा सारखे प्रचंड काम करता येईल असे खाते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी  शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्याने सरपंच परिषदेच्या वतीने     सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र जळगाव जिल्हाअध्यक्ष बाळू धुमाळ, श्रीकांत पाटील सचिव, जिल्हा सरचिटणीस राजमल भागवत तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, तालुका अध्यक्ष बाळू चव्हाण, तालुका समन्वय युवराज बाबुराव पाटील,व प्रदेश सरचिटणीस अँड. विकास जाधव, सर्व राज्य विश्वस्त, विभागीय तसेच जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने आभार मानतो..

असे ही प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे म्हणाले. मंत्री गिरीश महाजन या  ग्रामीण विकास  विभागाचा आलेख निश्चितच उंचावतील… आणि या विभागाद्वारे… महाराष्ट्र राज्यातील जनतेला

 

न्याय देतील याची खात्री असल्याचे ते म्हणाले. दत्ताभाऊ काकडे यांनी     दूरध्वनीवरून  केले महाजनांचे अभिनंदन ग्रामविकास हा विभाग कार्यक्षम मंत्र्याकडे यावा ..

ही सरपंच परिषदेने  मागणी केलेली होती.. आज खाते वाटप जाहीर झाल्या नंतर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी नूतन ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे दूरध्वनी वरून अभिनंदन करीत त्यांना राज्यातील तमाम सरपंच बांधवाच्या वतीने शुभेच्छा दिल्या…

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment