गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

जळगाव : शहरातील कांचन नगर येथे आज सकाळी 8 वाजता घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर चौघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले असून चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील कांचननगर भगत असलेल्या समर्थ बैठक हॉलजवळ आकाश मुरलीधर सपकाळे हा तरुण परिवारासह राहतो. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चार ते पाच जणांपैकी एकाने त्याच्या घरात प्रवेश करून त्याच्यावर गोळीबार केला. आकाशच्या कुटुंबीयांनी प्रतिकार केल्याने हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पायरीवरून पाय घसरून तो पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला.

घरात ४ काडतूस पडल्या असून घरा बाहेर १ गावठी कट्टा आणि १ काडतूस पडले आहे. घटनास्थळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे पथकासह पोहचले असून तपास सुरू आहे. दरम्यान, ४ हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्ल्यात २ पिस्तुलाचा वापर झाल्याचे समजते. वाद पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment