जन्मल्या तिघी, जुळलेल्या जुळ्या दोघी !

तीन लेकींचा जन्म, दोघी जुळल्या आजन्म : जळगावातील पहिलीच शस्त्रक्रिया

जळगाव : खासगी दवाखान्यात एका महिलेने तीन लेकींना जन्म दिला. त्यातील ‘जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे.

डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे मध्यप्रदेशातील विवाहिता उपचार घेत होती. जळगावचे माहेर असलेल्या या विवाहितेला एक मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिला गर्भधारणा राहिली. त्यानंतर तपासणी केली त्या वेळी तिच्या गर्भात तीन बाळ असल्याचे दिसून आले. त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ सुरक्षित असल्याने गर्भपाताचा पर्यायही संपला. त्यामुळे या दाम्पत्याने बाळंतपणासाठी तयारी दाखविली. त्यानुसार डॉ. नवाल यांनी मंगळवारी सकाळी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. नवजात लेकींपैकी जुळलेल्या जुळ्यांना तातडीने बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरव महाजन यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे.

 

जुळ्यांना एकच शरीर
नवजात जुळ्या लेकींचा मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र शरीर, हात आणि पाय एकत्र आहेत. त्यामुळे दोघींना दोन हातांनी आणि पायांनी सोबत जगावे लागणार आहे. दोघींना एकच हृदय आहे.

 

 

या जुळलेल्या जुळ्यांचे वजन सव्वा दोन किलो आहे. त्यांच्या नशिबी जन्मताच श्वासकोंडी आहेच. म्हणूनच दोघींना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. अन्य वैद्यकीय अहवाल प्राप्तीनंतर उपचाराची दिशा निश्चित करण्यात येईल.

– डॉ. गौरव महाजन, बालरोग तज्ज्ञ

बातमी शेअर करा !
#JALGAON NEWSजळगावातील पहिलीच शस्त्रक्रियाजुळलेल्या जुळ्या
Comments (0)
Add Comment