जळगाव आकाशवाणी केंद्राचा आज वर्धापनदिन पे

 

कवी, लेखक व साहित्यिकांचा सत्कार

जळगाव, :– जळगाव आकाशवाणी केंद्राचा ४८ व्या वर्धापनदिन १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत नाट्यकर्मी, लेखक, कवी व‌ साहित्यिकांचा गौरव केला जाणार आहे. अशी माहिती कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे व अभियांत्रिकी प्रमुख दिलीप म्हसाने यांनी दिली आहे.

आकाशवाणी केंद्रावर होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, साहित्यिक विश्वास पाटील, निर्मल सीड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी, जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, अॅड. शुचिता अतुलसिंह हाडा, जळगाव जनता सहकारी बँकचे अध्यक्ष सतीश मदाने, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

मान्यवरांच्या हस्ते परिवर्तन नाट्यसंस्था, डॉ. धर्मेंद्र पाटील , केतन चौधरी , चैतराम पवार, तेजस पाटील, वसंत मयूर, प्रितमा टोके, विश्वनाथ अग्रवाल , भुजंगराव बोबडे, देवयानी गोविंदवार , वा. ना. आंधळे , अद्वैत दंडवते व प्रणाली सिसोदिया यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

निर्मल सिड्स (पाचोरा), भारत गृह उद्योग (भुसावळ) आणि आकाशवाणी केंद्र – जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.‌ प्रसारण अधिकारी किशोर पवार संगीत रचयिता संजय हांडे, विजय भुयार, उदघोषक‌ नरेंद्रकुमार ठाकूर, आकाशवाणी केंद्राचे अधिकारी – कर्मचारी यासाठी मेहनत घेत आहेत.

०००००००००००००००००

बातमी शेअर करा !
#jalgaonakashvani
Comments (0)
Add Comment