जळगाव : ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेने आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मा.ना.गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडलूणे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

 

सविस्तर वृत्त असे कि, जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच महिलेला रोखलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. वंदना सुनील पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे.

संबंधित महिला आणि तिच्या पतीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभरापासून उपोषण सुरू होतं. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने महिलेनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या दाम्प्त्याच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केली असल्याचा त्यांचा आरोप आहे.

फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही महिला आणि तिचा पती करत आहे. यासाठी महिन्याभरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे. मात्र, कोणीही दखल न घेतल्याने महिलेनं हे पाऊल उचललं. ध्वजारोहण सोहळ्यावेळीच वंदना पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment