जामनेर तालुक्यातील मिराच्या पळासखेडे येथे लंम्पी आजारा संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली पाहणी

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे आज दि.२१ सप्टेबंर २०२२ बुधवार रोजी जामनेर तालुक्यातील मिराच्या पळासखेडे येथे लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पंकज आशिया साहेब यांनी भेट दिली असून पशुपालक शेतकऱ्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले. यावेळी लंम्पी आजाराने मृत्यूपावलेल्या जनावरांची माहिती घेतली असता लागण झालेल्या जनावरांवर योग्य उपचार शासना तर्फे करण्यात आले. व पशुपालकान, गोठा परिसरात स्वच्छता राखण्याच्या सूचना याठिकाणी देण्यात आल्या. लंम्पी आजारा विषयी पाहणी करतेवेळी गटविकास अधिकारी श्री.व्ही.एम.सनेर साहेब,तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्रीकांत व्यव्हारे आदी त्यांचे सहकारी तसेच ग्रा.प.पळासखेडे मिराचे ग्रामविकास अधिकारी श्री.डी.पी.टेमकर,उपसरपंच श्री.रविंद्र प्रकाश हडप, मंगलसिंग भाऊ राजपूत,महावीर भाऊ जैन,गोपाळ हडप आणि गावातील शेतकरी ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment