जामनेर पोलिस स्टेशन ची अवैध धंद्यावर बेधडक कारवाई

अवैध धंद्ये करणार्यांचे धाबे दणाणले
जामनेर पोलिस निरीक्षक कर्तव्य दक्ष किरण शिंदे साहेबांची उत्कृष्ट कामगिरी


जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे


आज दि.०४/०९/२०२२ रोजी जामनेर पोलिस स्टेशन हद्दीत असलेले अवैध धंद्यावर कारवाई करण्या बाबत मा. पोलिस अधीक्षक श्री.प्रविणजी मुंढे,सो. मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.रमेश चोपडे, सो.चाळीसगाव परिमंडळ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भारत काकडे,सो.पाचोरा भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे साहेबांनी अवैध धंद्यावर बेधडक कारवाई करून हातभट्ट्या आज रोजी उद्ध्वस्त केल्या आहेत.

अवैध धंद्ये करणारे सदर आरोपी असे आहेत की
१)विकास रमेश खामकर बजरंग पुरा,जामनेर
२) रामकृष्ण सोमू भिल रा.गारखेडा
३)भरत दामू भिल रा.गारखेडा
४)दीपक नथ्थू ठाकरे रा.गारखेडा
५) आत्माराम तुळसिराम पवार रा.गारखेडा
६) रमेश सखाराम भिल रा.हिंगणे बु. जामनेर
७)शिवलाल किसन गायकवाड रा.करमाड,ता.जामनेर
८)बाबुलाल किसन गायकवाड रा.करमाड,ता.जामनेर
९) रविंद्र रंगनाथ सुरवाडे रा.शहापूर
१०) विमलबाई रामदास भिल रा.शहापूर
११)ईश्वर मकडू भिल रा. खडकी जामनेर
१२) ज्ञानेश्वर शांताराम राठोड रा.कापूसवाडी
१३)हरदास जगदेव बेलदार रा.कापूसवाडी
१४)सोपान अशोक कोळी रा.कापूसवाडी
१५)धनसिंग धिरसिंग राठोड रा.कापूसवाडी तालुका जामनेर या अवैध धंद्यावर कारवाई करून सुमारे ४,२८,०५०/-रूपयांचा माल व गावठी हातभट्टीदारू तसेच रसायने नष्ट करण्यात आले.
यावेळी अवैध धंद्यावर बेधडक कारवाई करतांना जामनेर पोलीस स्टेशन चे उपपोलीस निरीक्षक श्री. दिपक मोहीते,जामनेर पोलीस निलेश घूगे,व पोलीस स्टॉप सह जामनेर तालुक्यातील अवैध दारू धंद्यावर सर्वात मोठी कारवाई केली आहे. सदर धडक कारवाई मुळे दोन नंबर धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.
जामनेर पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी मूळे प्रत्येक गावातील नागरिकांकडून जामनेर पोलीसांची प्रशंसा केली जात आहे व नागरिकांमधे आनंद व्यक्त होत आहे.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment