जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे
जामनेर शहरातील नगरपालिका चौकात आज रोजी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारा वि षयी निषेध केला असून संतप्त झालेले शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील व युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील यांच्या उपस्थित शिवसैनिकांनी जामनेर येथे नगरपालिका चौकात तीव्र स्वरूपात आंदोलन घडवून आणले आहे.
या ठिकाणी जामनेर शिवसेना पक्षाचे कट्टर शिवसैनिक व देऊळगाव फत्तेपुर गटातील जिल्हा परिषद गट प्रमुख तुकाराम सखाराम गोपाळ यांनी घोषणाबाजी देऊन आंक्रोश केला.
तसेच उपस्थित भरत पवार,मोहन जोशी,दिपक माळी,जामनेर शहर प्रमुख अतूल सोनवणे, सोशल मिडिया मुकेश जाधव, ज्ञानेश्वर जंजाळ,मयूर पाटील, विशाल लामखेडे,आदी पदाधिकारी यावेळी होते.
पक्ष सोडून गेलेले आमदारांनी शिवसेना पक्षाला दगा दिल्याने प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर सर्वात मोठी बंडखोरी शिवसेना पक्षात होत आहे.
शिवसेना पक्ष हा कधीही संपू देनार नाही असे शब्द दर्शवनारे
शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी केले असता पक्षाचा मोठ्या प्रमाणात विश्वासघात केला आहे.
या उद्देशाने जामनेर येथील समर्थक(शिवसैनिकांनी) गुरुवार रोजी नगरपालिके समोर राजमाता जिजाऊ चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.