जामनेर येथील विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित, लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल येथे विद्यार्थी पालक मेळावेचा कार्यक्रम संपन्न.

आज दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित,लिटिल नेस्ट माय छोटा स्कूल, जामनेर तर्फे आयोजित विद्यार्थी पालक मेळावा उत्तम अश्या सकारात्मक संवादाने व प्रतिक्रिया नी कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची काळजी घेणे, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे,वेगवेगळ्या कार्यशाळा घेणे त्यासोबत चांगले संस्कार व्हावे यासाठी योग्य त्या संस्कारक्षम कार्यक्रमाची योजना शाळेतील शिक्षक-शिक्षिका घेत असतातच परंतु पालकांच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतात की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांना आवश्यक असणारा बदल व्हावा. यासाठी या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. अश्या प्रकारे शाळेच्या प्राचार्य सौ.केतकी राहुल चव्हाण यांनी पालकांना मार्गदर्शनात सांगितले. आज भरपूर छान प्रतिक्रिया या पालकांच्या आपल्या पाल्याच्या संदर्भात आल्या आहेत.विद्यार्थी रोज शाळेत येतांना आई-वडिलांचा नमस्कार करतात,अभ्यास करतात,छान अश्या संस्कारक्षम सवयी मुलांना लागलेल्या आहेतं. अश्या भरपूर प्रतिक्रिया पालकांच्या आलेल्या आहेतं त्यासोबतच आपल्या पाल्याच्या मध्ये झालेल्या बदलामुळे पालक समाधानी आहेतं. आजच्या पालक मेळाव्यात प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सौ.दिपाली येणे यांनी केले तर सौ.नयना पाटील यांनी आभार मानले असता त्यासोबत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment