जामनेर येथे पुरा भागातील इंदिराबाई ललवाणी शाळेमध्ये शालेय पोषणाचा व विज्ञान प्रदर्शना अंतर्गत चा कार्यक्रम संपन्न

जामनेर येथे पुरा भागातील इंदिराबाई ललवाणी शाळेमध्ये शालेय पोषणाचा व विज्ञान प्रदर्शना अंतर्गत चा कार्यक्रम संपन्न करण्यात आला सविस्तर वृत्त जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे जामनेर शहरातील उच्च प्रकारचे शिक्षण देणारी व शिक्षणाची जननी म्हणजे इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय जामनेर पूरा असून या शाळेमध्ये आज दिनांक 20 सप्टेंबर 2022 रोजी शालेय पातळीवर विज्ञान प्रदर्शन आणि शालेय पोषण आहारा बाबतीत माहिती देण्याचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी कार्यक्रमामध्ये शालेय पोषणासंदर्भात असलेले फायदे व पोषण आहाराचे महत्त्व आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री लोहार साहेब, सहकारी संस्थेचे सचिव श्री किशोरजी महाजन,सर्व संचालक मंडळ तसेच शालेय पोषण आहाराबाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अधीक्षक श्री काळे साहेब, ललवाणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जे.पी पाटील सर,आदि पदाधिकारी सर्व शिक्षक व मॅडम उपस्थित होते. अशाप्रकारे हा कार्यक्रम यशस्वी रितीने आयोजित करण्यात आले.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment