जामनेर शहरासह तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे याबद्दल जामनेर पोलिस स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे जामनेर शहरात तालुक्यात सर्रास अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत आला असून अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी युवक शहराध्यक्ष सचिन बोरसे व पदाधिकारी यांच्या वतीने जामनेर पोलिस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये तिव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील सट्टा पत्ता दारू मटका गुटका पोलीस दूरक्षेत्राचे हाकेच्या अंतरावर हे अवैध धंदे चालतात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेस युवक शहराध्यक्ष सचिन बोरसे यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त करत आहे.या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे . निवेदण देते वेळी . राष्ट्रवादी ता. अध्यक्ष विलास राजपूत, डॉक्टर प्रशांत पाटील युवक तालुकाध्यक्ष, किशोर पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, माधव चव्हाण माजी नगरसेवक, रामदास पालवे, संदीप हीवाळे, संतोष झाल्टे, प्रभू झाल्टे, मोहन चौधरी ,दत्ता नेरकर शहर कार्याध्यक्ष ,अनिल निंबाळकर ,सागर निकम, शुभम चौधरी,दीपक खाटीक,भूषण धनगर,गोलू खाटीक, पराग नेरकर, सुनील नेमाडे ,नरेंद्र जंजाळ, विशाल रोकडे, खालिद साहब,अरविंद तायडे, अरविंद वाढे, मनोज तंवर, दिलीप सोनवणे, विकास सोनवणे, निखिल परदेशी, आकाश पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment