दारूच्या अवैध विक्रीला उधाण….. जामनेर तालुक्यातील वाघारी बेटावद रस्त्यावरील झोपडीत विकली जाते अवैधरीत्या गावठी फुगे सह देशी दारू

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार सध्या सरकारमान्य देशी दारू दुकानांतून पार्सलच्या रूपात दारू विक्री सुरू असून ही विक्री किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. जामनेर तालुक्यातील वाघारी बेटावद रस्त्याने भरदिवसा रात्री भागात देशी दारू पासून तर गावठी फुगे विदेशी दारूपर्यंत सर्वच प्रकारची दारु विकली जात आहे.या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे. तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रते वागताना दिसत आहेत. एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू करतात. अवैध दारु विक्रीचा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला सूचना देऊनही या प्रकाराकडे लक्ष दिले जात नसल्याने यावर वरदहस्त नेमका कुणाचा? असा सवाल ग्रामवासियांतर्फे निर्माण होत आहे.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment