धक्कादायक; पारोळा शहरात घराच्या छतावर आढळले लचके तोडलेले मृत अर्भक

पारोळा । प्रतिनिधी 

शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात आज सकाळी कंमरेपासून भाग तुटलेल्या अवस्थेत एक नवजात अर्भक मृत स्थितीत आढळून आल्याने पारोळा शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात राहणारे इबा (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्या घरातील महिला आज सकाळी १० वाजता कपडे टाकण्यासाठी छतावर गेले असता त्यांना कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पारोळा शहरात खळबळ उडाली आहे. नेमके हे बालकाच्या पालकांचा थांग पत्ता लागलेला नसला तरी घराच्या छतावर त्याला कुणी आणून टाकले ? कमरे खालचे शरीर छतावर आणून टाकण्यापुर्वी तुटलेले होते की छतावर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले ? काहीही झाले तरी अश्या परिस्थितीत या नवजात अर्भकाला अशा विचित्र पध्दतीने छतावर टाकून देणारे निर्दयी लोक कोण असावेत ? या बालकाचा जन्म विवाह बाह्य संबंधातून झालेला असला तरी त्याचे शरीर असे तुटलेल्या अवस्थेत समोर दिसते आहे. मात्र हे घडले कसे ? अश्या प्रश्नांची मालिका सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment