धक्कादायक ; वीज बिलाची वसुली करणाऱ्या अभियंत्याला ग्राहकाकडून मारहाण (व्हिडिओ)

जळगाव | प्रतिनिधी
जळगावात वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला चक्क थकबाकी असलेल्या ग्राहकानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याच्या डोक्यात कुदळ घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ग्राहक अभियंत्यासोबत वाद घालत असल्याचं दिसत आहे. याशिवाय त्याने अभियंत्याला मारण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसत आहे.
अभियंत्यांसोबत असलेल्या इतर दोन कर्मचार्‍यांनी वेळीच त्याला पकडून बाजुला केले. अन्यथा दुर्घटना घडली असती. दरम्यान याप्रकरणी एकच खळबळ उडाली असून अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी वरिष्ठांकडून सक्ती केली जात असल्याने आता थकबाकी करायची कशी असाही प्रश्न कर्मचाऱ्यांमधील उपस्थित होत आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अनेकांच्या हातातलं काम गेलं होतं. त्यामुळे नियमित वीज बिल भरणं कठीण झालं होतं. यानंतर मंत्र्यांनी यात काही प्रमाणात सूट दिली होती. असं असलं तरी त्या काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आली होती. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यात आता वीज बिलाची वसुली करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत ग्राहकांकडून चुकीची वागणूक केली जात असल्याचं अनेक ठिकाणी समोर आलं आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment