नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणल्यानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. शिवसेना पक्षबांधणीसाठी झटत आहे तर त्यांचे विरोधक महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी काल शिवसेनाप्रमुख उद्दव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच स्वरुपाचा आरोप आज आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आमदार सुहास कांदे यांनी मविआच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा नाकारल्याचा आरोप केला होता. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री असल्याने त्यांना विशेष सुरक्षा देण्याची गरज होती, पण ती उद्धव ठाकरे यांनी रोखली. तसेच त्यांची हत्या करण्याची सुपारी त्यांनी नक्षवाद्यांना दिली होती, असे गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केेले.
आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर आरोप केेले आहेत. एकनाथ शिंदें प्रमाणेच माझ्या वडिलांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांना संपवण्यासाठी तथाकथित विवेकी सभ्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या, असे गंभीर आरोप राणे पुत्रांनी केले. त्यामुळे गेले दोन दिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दोघांच्या हत्येचे प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहेत. यावर अद्याप उद्धव ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. पुण्यात डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित एका ग्रंथ प्रकाशनात ते बोलत होते. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी विशेष सुरक्षा देण्यात आली होती, असं पवार म्हणाले. तसेच पत्रकारांनी राणे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले, पोराबाळांच्या प्रश्नांवर मी बोलणं योग्य होणार नाही.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment