नेहरू युवा केंद्रामार्फत ‘आत्मनिर्भर युवा शिबिर’ संपन्न

अमळनेर :- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र अमळनेर मार्फत आत्मनिर्भर भारत युवा शिबिराची कार्यशाळा १३ फेब्रुवारी या दिवशी संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षीय उद्घाटन प्राध्यापक भावसार व प्रमुख उपस्थिती मा.आ.स्मिताताई वाघ
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री रत्नाकर शिरोळे श्री गौरव खोडपे व विद्यापीठ सिनेट सदस्य दिनेश नाईक उपस्थित होते .
प्रा.भावसार यांनी अध्यक्षीय भाषणात स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असून. अशा युवा शिबिराच्या आयोजनातून तरुणाईला प्रत्येकाच्या विचारांना तरुणांच्या कृतीला जोड मिळण्यास वाव मिळतो.आणि विविध क्षेत्रात युवक प्रभावीपणे आपली भूमिका बजावण्याची प्रेरणा मिळते. प्रमुख अतिथी माननीय मा.आ.स्मिताताई वाघ यांनी युवकांना पर्यावरणाचे महत्त्व व त्याच दरम्यान "पाणी आडवा पाणी जिरवा "यासंदर्भात ची माहिती सांगितली स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून प्रत्येक क्षेत्रात स्वयम् व्यवसायांनी अग्रेसर राहिले पाहिजे अशी माहिती दिली.

प्रमुख वक्ते श्री रत्नाकर भिरूड यांनी आत्मनिर्भर भारतासाठी भारत सरकार नेहमीच युवकांसाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक नागरिकाने स्वयम् निर्भय होण्यासाठी योग्य योजना आखणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे असे सांगितले. छोट्या छोट्या उद्योगातून स्वतः रोजगार निर्माण करून या देशाचा आर्थिक विकासात हातभार लावण्याचे काम आहे. युवकांचे कार्य पटवून देण्याचे काम सरांनी केले यामुळे युवकांना शासकीय योजना आणि त्यातून आत्मनिर्भर होणे .आपला स्वतःचा व्यवसाय कसा करावा शिक्षणाला व्यवसायाची जोड कशी असावी याबद्दलची सखोल मार्गदर्शन या शिबिरातून करण्यात आले.श्री दिनेश नाईक यांनी युवकांना खेड, ट्रेडिंग ,योगा, व्यायाम ,आहार, शिक्षण, या सर्वांना जोडून व्यवसाय हा आपला स्वावलंबनाचा विषय आहे हे युवकांना पटवून दिले. त्यामुळे युवक प्रेरित होऊन स्वबळावर स्वतःचे विश्व निर्माण करतील असे उत्तुंग भरारी घेण्याचे बळ त्यांना नेहरू युवा केंद्र मार्फत या शिबिरातून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्र अंमळनेर समन्वयक वैशाली दिपक पाटील यांनी केले.

नेहरू युवा केंद्र सदस्य अभिषेक पाटील, शैलेश पाटील, दिपक पाटील,गौरी निकुंभ,तेजस पाटील, रसमी निकुंभ,कुणाल मोरे इत्यादी सदस्यांनी खूप मदत केली.हा कार्यक्रम अमळनेर तत्वज्ञान केंद्रात पार पडला.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment