पोदार प्रेप शाळेत गांधीजी आणि शास्त्रीजी यांची जयंती उत्साहात साजरी

जळगाव ;- पोदार प्रेप येथे २ ऑक्टोंबर या दिवशी गांधीजी व शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली.

या विशेष दिवसाचे औचित्य साधून पोदार प्रेप मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गांधीजी यांची देशभक्ती, देशप्रेम, तसेच सत्य, अहिंसा ह्या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये रुजवला जावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, बापूची वाटीका, बापुंच्या पादुका, बापूंचा चष्मा यांचे प्रदर्शन मांडले होते तसेच विविध स्वातंत्र्य सैनिक यांच्या वेशभुषा विदयार्थ्यांनी साकारल्या होत्या हे या कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण बनले. तसेच विदयार्थ्यांमध्ये शास्त्रीजींनी देशाला सुजलाम् सुफलाम् बनवून देशामध्ये दुग्धक्रांती घडवून आणली याचे महत्व पटवून देण्यासाठी विदयार्थ्यांनी विविध कलाकृती केल्या ज्यात त्यांनी गांधी टोपी बनवली. मुलांना धोती नेसवण्यात आली तसेच छोटे रोपट्या पासून झाड कसे विकसित होते ते चित्रीकरणाच्या माध्यमातून दाखवण्यात आले. गांधीजींचे तीन माकड म्हणजेच वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका हा संदेश देण्यात आला. तसेच बापूच्या वाटीकेत पालकांनी पुष्पहार अर्पण करूनगांधीजींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

अशा प्रकारे घ्या कार्यक्रमाला पालकांचा प्रचंड सहभाग लाभला. या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री. गोकुळ महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उमा पाटील व कार्यकारी अधिकारी श्री जितेंद्र कापडे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा !
podar school
Comments (0)
Add Comment