पोलिसांशी मस्करी चांगलीच आली अंगाशी..११२ क्रमांक केला होता डायल…

अमळनेर :- तालुक्यातील डांगर येथील इसमाने गमतीत ११२ क्रमांकावर कॉल करत भांडण होत असल्याची माहिती दिल्याने गंमत त्याला चांगलीच महागात पडली आहे.
अति तात्काळ सेवांसाठी जिल्हा पोलिस विभागाकडून ११२ ही फोन सेवा सुरू करण्यात आली असून या यंत्रणेवर रात्र दिवस पोलीस अंमलदाराची नियुक्ती केली आहे. काल २२ जानेवारी रोजी अमळनेर तालुक्यातील डांगर येथील धनराज कडू भील याने ११२ क्रमांक डायल करत भांडण असल्याची तक्रार करत पोलीस मदत तात्काळ पाठवण्याची मागणी केली. लागलीच धाव घेत अमळनेर पोलीस ठाण्यातून पो.ना. भामरे, पोहेकॉ मधुकर पाटील, पोना सूर्यकांत साळुंखे यांनी डांगर येथे भेट दिली धनराज याला विचारले असता त्याने सांगितले की, मी मजाक मध्ये ११२ क्रमांकावर फोन केला असून पोलीस येतात की नाही ते पहायचे होते असे सांगत भांडण वैगरे काही झाले नाही असे सांगितले. सदर इसम धनराज हा दारूच्या अमलाखाली असल्याचे समजून आले. त्यास पोलीस ठाण्यात आणून खोटी माहिती दिल्याप्रकरणी भादवि कलम १८२, व महा. दारूबंदी अधिनियम ८२(१) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment