प्रत्येक ग्रामपंचायतला रोजगार हमी योजनेतून परिपूर्ण सुविधा मिळाविण्यासाठी सरपंच परिषद मुंबई, जळगाव चे जिल्हाध्यक्ष बाळू धूमाळ यांनी मंत्री संदीपान भुमरे यांची घेतली भेट

जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे दि २१ प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीला रोजगार हमी योजनेतून शाळा,अंगणवाडी, सांस्कृतिक सभागृह व वृक्ष लागवडीसाठी परिपूर्ण सुविधा मिळाव्यात त्यासाठी चार मजूरांची परवानगी मिळावी याकरिता आज रोजी सरपंच परिषद मुंबई, जळगाव चे जिल्हाध्यक्ष बाळू धूमाळ,राजमल भागवत,युवराज डोळे,संजय बापू जगदाळे, पदधिकार्यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांची घेतली भेट. गावातील स्वछता राहील आणि ती ठेवल्याने गावे रोगराई पासून मुक्त होतील त्याच प्रमाणे पांदन रस्त्यांची संख्या वाढवावी, कामे तात्काळ सुरु करावेत यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने राज्याचे रो ह यो मंत्री संदीपान भुमरे साहेबांची मुंबईत प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव, राज्यविश्वस्त राजाराम पोतनीस, अ नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, अंबादास गुजर,दयानंद पाटील,नांदेड प्र. जिल्हाध्यक्ष नारायण कदम, संदीप देशमुख, चंद्रशेखर साके, मनीषाताई यादव, श्रीकांत पाटील, जळगावं प्र. जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ,राजमल भगत, युवराज डोळे आदी- संजय बापू जगदाळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment