प्रधान मंत्री जलशक्ती अभियानाअंतर्गत चिंचोली पिंप्री गावाची उत्तर महाराष्ट्र पदी निवड

चिचोली पिंप्री /प्रतिनिधी- विश्वनाथ शिंदे प्रधान मंत्री जलशक्ती अभियानाअंतर्गत चिंचोली पिंप्री या गावाची उत्तर महाराष्ट्र पदी निवड करण्यात आली असून याबद्दल आज दि २९/०९/२०२२ गुरूवार रोजी जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री गावातील माजी सरपंच विनोद चौधरी यांचा सत्कार प.स.चे गटविकास अधिकारी सननसे साहेबांनी यावेळी केला आहे. प.स. जामनेर येथे तीन दिवशीय रोजगार सेवकांचे प्रशिक्षण चालु असल्याने उत्तर महाराष्ट्र तुन जलशकी अभियान अंतर्गत महाराष्ट्र तून१४ गावांची निवड यावेळी केद्र सरकार कडून करण्यात आल्यामुळे पूणे येथे तीन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी चिंचोली पिंप्री गावाची जल बचतीचे व्हीडीओ संदर्भात कामे संपूर्ण भारतभर दाखविण्यात आले. या अनुसंगाने पुणे येथील कार्यक्रमात चिंचोली पिंप्री या गावाची उत्तर महाराष्ट्र पदी नियुक्ती करण्यात आली. याठिकाणी माजी सरपंच विनोद चौधरी यांचा सत्कार प.स. जामनेर गटविकास अधिकारी सनंनसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे व संपूर्ण गावाची तालुक्यात नाव प्रशंसा केली जात आहे . या बाबत सरपंच विनोद चौधरी यांनी गावातील सर्व गावकर्‍यांनी साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment