फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी आत्माराम गांवडे यांची बिनविरोध निवड

फत्तेपूर/प्रतिनिधी -सुनिल शेजूळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी जेष्ठ सदस्य आत्माराम गांवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.असून याप्रसंगी ईश्वर मंडलेचा,पुना शेजूळे, दिनेश गोडंबे, सलीम पटेल,ईश्वर राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपसरपंच आत्माराम गांवडे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व निवडीबाबत ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सेवानिवृत्त अभियंता जे.के चव्हाण यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. यावेळी सभेच्या अध्यक्ष स्थानी उपस्थित सरपंच सौ.पुष्पाताई शेजूळे , ग्रामपंचायत सदस्य सौ.कांताबाई देठे,निगारबी पटेल, श्रीमती सुपियाबी कंसाई,सौ.वैशाली गोडंबे,सौ.आश्विनी कोळी, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील, देविदास कूंभार,फिरोज तडवी,रमेश कूंभार,मनोज चोरडीया तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बबलू भंसाळी, ईश्वर मंडलेचा,पुना शेजूळे,माजी उपसरपंच ईश्वर पाटील,तानाजी धांडे,सलीम पटेल,शकील कुरेशी यांच्या सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदी आत्माराम गांवडे यांची बिनविरोध निवड
बातमी शेअर करा !
WhatsAppFacebookTelegramTwitterShare
Comments (0)
Add Comment