मारवाड़ येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड तालुका अमळनेर येथील पंच वार्षिक निवडणूक

अमळनेर (प्रतिनिधी:- नूर खान)मारवाड़ येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड तालुका अमळनेर येथील पंच वार्षिक निवडणूक 2021/22ते2025/26 साठीची पहिली सर्वसाधारण सभा बहुसंख्य सभासदांच्या उपस्थित संपन्न. ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील पंचवार्षिक निवडणूक 21- 22 ते 25- 26 या पाच वर्षासाठी बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाची पहिली सर्व साधारण(जनरल सभा) सभा संस्थेच्या बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत संस्थेचे नव निर्वाचित अध्यक्ष आबासो.अरविंद वासुदेव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या आवारात संपन्न झाली .सदर सभा मारवड व परिसरातील बहु संख्य सभासद बंधू,भगिनीच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरवातीला संस्थेचे दिवंगत सभासद, व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.सभेला अध्यक्ष यांनी संबोधन केले असता नवीन बिनविरोध निवडून आलेल्या पहिल्या कार्यकारी मंडळातील मीटिंग मधील विषयांचे वाचन करून सर्व विषयांना जनरल सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली तसेच बिनविरोध निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य व वारस वंश परंपरा सदस्य म्हणून निवड झालेले अरविंद वासुदे साळुंखे अध्यक्ष,नानासो. लोटन फकिरा पाटील उपाध्यक्ष, रावसो.दिनेश भाऊराव शिसोदे ऑन.सेक्रेटरी, बापुसो.वसंत चुडामण पाटील, नानासो. शरद भालचंद्र पाटील, आबासो. अशोक नथू पाटील, दादासो. अनिल साहेबराव पाटील, दादासो. पुंजू वंजी शिसोदे, भाऊसो. प्रकाश अमृत शिसोदे, दादासो. दगडू तुकाराम पाटील, दादासो. विठ्ठल दशरथ पाटील, वारस वंशपरंपरा सदस्य म्हणून दादासो. योगेश मधुसूदन मुंदडे, ताईसो.सुरेखा लोटन पाटील, आबासो. विश्वासराव विनायकराव पाटील,तसेच बापुसो. वासुदेव मन्साराम पाटील याची पुढील पाच वर्षासाठी झालेली निवड व संस्थेचा कार्य भार स्वीकारणे बाबत चर्चा करून त्यांना उपास्थित सर्व सदस्यांनी मंजुरी दिली तसेच प्रत्येक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच सभेत उपस्थित सभासदांनीही मार्ग दर्शन केले व शेवटी उपस्स्थित सर्व सभासद बंधू भगिनिंचे अध्यक्ष यांनी आभार व्यक्त करून शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment