मीरा हॉस्पिटल जामनेर येथे तळेगाव येथील रूग्णाच्या नातेवाईकांच्या संतप्त भावना

जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे. जामनेर शहरातील मल्टी स्पेशालिस्ट मीरा हॉस्पिटल मध्ये तळेगाव येथील एका महिलेचे शिजर करण्यात आले असून पंधरा दिवसांतच महिलेची तबियत चिंताजनक ,त्यानंतर महिलेला योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी दवाखान्यात संतप्त भावना व्यक्त केल्याची घटना आज रोजी घडली आहे. सविस्तर वृत्त असे की जामनेर शहरातील जळगाव रोड येथील मीरा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये तालुक्यातील तळेगाव येथील महिला प्रसूतीसाठी आणली असता सदर महिलेचे सिजर करण्यात आले.होते ,प्रसूती योग्य होवून महिलेला पंधरा दिवसा अगोदर दिस्चार्ज देण्यात आला होता,परंतु काही कारणास्तव महिलेची तब्येत खराब झाल्याने पुन्हा हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले,त्यानंतर डॉक्टरांनी महिलेला जळगाव हलवावे लागेल असे सांगितल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल येथे गर्दी करून संतप्त भावना व्यक्त करत माहिती दिली. सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी जामनेर येथील काही पत्रकारांना सदर घटनेची माहिती दिली पत्रकारांनी डॉक्टरांना घटनेची माहिती विचारली असता डॉक्टरांनी महिलाही पंधरा दिवसांपूर्वी सिजर होऊन घरी गेलेली होती त्यानंतर सदरील घटना हि त्यांच्या घरी घडलेली आहे तरी देखील मी व्यवस्थित उपचारार्थ स्री सर्जन यांच्याकडे जळगाव येथे रेफर करून सर्व खर्च मी स्वतः करणार असल्याची माहिती डॉक्टर आशिष वाघ यांनी दिली या सर्व घटनेनंतर संतप्त झालेले नाते वाईकांनी आपला आक्रोश शांत केला आहे.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment