मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वृक्षारोपण

जामनेर | प्रतिनिधी
जामनेर शहरातील जुना बोदवड वरील जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. १३ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित जिकरा इंग्लिश मिडीयम स्कूल व न्यू ऊर्दू प्राथमिक शाळेच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले यांच्या सह संस्थेचे अध्यक्ष-रहीम शेख,सचिव-जाकीर शेख,तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,कर्मचारी व शाळा सल्लागार समितीचे सर्व सदस्य व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले यांचा शाळेचे अध्यक्ष-रहीम शेख व सचिव-जाकीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर मुख्याधिकारी-चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी-भोसले यांनी जिकरा एज्युकेशन सोसायटीच्या कामाबद्दल माहिती जाणून घेत शाळा प्रशासनाच्या कामाचे व शाळे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेकडून मिळणाऱ्या सुविधा, शिक्षण इत्यादींची माहिती घेत शाळा प्रशासनाच्या कामांचे कौतुक केले.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment