मोठी बातमी! देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर

नागपूर । भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी धर्माच्या विषयावर एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम होणार असून त्यात कोट्यवधी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील, यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे.

तसेच ते म्हणाले की, एससी-एसटी, ओबीसींसह एकूणच बहुजन समाजाचा मूळ धर्म बौद्ध धम्म आहे. आता अनेकजण पुढे येऊन विविध समाजघटक उघडपणे चर्चाही करू लागले आहेत. आपल्या मूळ धम्मात परतण्याची लोकांची इच्छा बळावत चालली आहे, असेही ते म्हणाले. भारतीय बौद्ध महासभा सगळीकडे फिरून जनजागृतीचे कार्य करत आहे. त्यावेळी बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले जात आहे, २०२५ सालचे नियोजन आम्ही केले आहे. त्यावर्षी कित्येक कोटी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील. हा कार्यक्रम दिल्लीत होईल. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्येही धम्मदीक्षेचे कार्यक्रम होतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

अनेकजण स्वेच्छेने यासाठी तयार आहेत, यासाठी ऑनलाईन बुकिंग केली जात आहे. कोणता धर्म स्वीकारावा, हा व्यक्तिगत प्रश्न आहे, यात सरकारचा हस्तक्षेप नको. अनेकांनी याबाबत बोलून सांगितले आहे. त्यामुळे काही राज्यांनी धर्मांतरणाचा केलेला कायदा हा योग्य नाही, असेही ते म्हणाले. यामुळे आता यामध्ये किती नागरिक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणावर नागरिक यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment