रस्ते, पुलांच्या कामांसाठी ५० कोटीचा निधी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश, वर्षभरात कामेे मार्गी लावणार-आ.मंगेश चव्हाण

चाळीसगाव | प्रतिनिधी

मुंबई विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून नव्यानेच स्थापन झालेल्या भाजपा शिवसेना युती सरकारने पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत विविध रस्ते, पूल आदींच्या कामांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने ५० कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. यामुळे दळणवळण विकास कामांना गती येणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्ते व पुलांची कामे मार्गी लागणार आहेत.

 

वर्षभरात रस्ते व पुलांची कामे मार्गी लावणार-आ.मंगेश चव्हाण

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्याला पुरवणी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पुलांचे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते, छोट्या पुलांवरून पाणी जात असल्याने एकलहरे गावातील एक व्यक्ती वाहून देखील गेली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे यासाठी निधीची मागणी देखील केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सदर मंजूर कामांमध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात पाण्याखाली जाणार्‍या पुलांची कामे घेतली असून भविष्यातील जीवितहानी त्यामुळे टळेल. तसेच आता भाजपा सेना युती सरकार आले असून येणार्‍या वर्षभरात तालुक्यातील मागणी असलेल्या इतर सर्व प्रमुख रस्त्यांना देखील पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ३०५४ ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते व पूल यासाठी निधी आणून त्यांची कामे सुरु केली जातील अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

 

तालुक्यातील हे कामे लागणाार मार्गी

शिरसगाव गावातील गटार व रस्ता सुशोभीकरण (२.५० कोटी), शिरसगाव स्मशानभूमी जवळ तसेच व टाकळी प्रदे शिवाजी विद्यालय जवळ पुलाचे बांधकाम (२.५० कोटी), पाटणादेवी बायपास क्र.२११ ते चाळीसगाव नगरपलिका हद्द रस्ता कॉक्रीटीकरण (२.५० कोटी), पाटणागाव ते पाटणादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता व सरंक्षण भिंत (१.२५ कोटी), शिवापूर गावा जवळ पूल व जोड रस्ता सुधारणा ( २ कोटी ), ओढरे गावा जवळ पूल व जोड रस्ता सुधारणा (२.५० कोटी), न्हावे चौफुली बोरखेडे बु ते रहिपुरी रस्ता सुधारणा (२.५० कोटी), दसेगाव दडपिंप्री -चिंचखेडे ते देवळी रस्ता सुधारणा (२.५० कोटी), भोरस ते बिलाखेड रस्ता सुधारणा (२.५० कोटी), शिरसगाव ते आडगाव रस्ता सुधारणा (२.५० कोटी), जामदा खेडगाव (खेडगाव गावात कॉक्रीटीकरण) ते जुवार्डी तालुका हद्द रस्ता सुधारणा (२.५० कोटी), भामरे गावाजवळील नदीवर पूल व जोड रस्ता बांधकाम करणे (२.५० कोटी), डोण दिगर ते हिरापूर रस्ता सुधारणा (२.५० कोटी), पिंजारपाडे – लोंढे ते खडकीसिम रस्ता सुधारणा (२.५० कोटी), मेहुणबारे गावात कॉक्रीट रस्ता, गटार ते पोहरे गावाजवळ नदी पात्रात रस्ता कॉक्रीटीकरण नंबर काम (२.५० कोटी ), एकलहरे गावाजवळ पुलांचे जोडरस्त्यासह बांधकाम (२.५० कोटी), कुंझर ते मोरदड रस्ता सुधारणा ( २.५० कोटी ), पिंप्री प्रदे गावाजवळील नदीवर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम ( २.५० कोटी ), बोरखेडे बु गावाजवळ न्हावे रस्त्यावरील पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम ( २.५० कोटी ), दडपिंप्री गावाजवळ पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम ( २.५० कोटी ), दस्तूर फाटा ते तळोदे प्रचा रस्ता व पूल सुधारणा (२.२५ कोटी )

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment