राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरू:शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता

सध्या राज्यातील कोरोनाच्या नियंत्रित पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने हा निर्णय घेतला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शाळेत जाण्यासाठी आतुर असणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणे आवश्यक असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अटेन्डन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

नियमांचे पालन आवश्यक:
• प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडणार.
• शाळेत खेळांना परवानगी नसेल.
• शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एसओपी तयार करणार.
•सोशल डिस्टन्सिंग चे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक.

लवकरच टास्क फोर्स मार्गदर्शक सूचना शाळांना कळणार असून शाळांबाबत चे सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असणार आहे. तसेच अद्याप निवासी शाळांबाबत निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा !
महाराष्ट्र राज्यवर्षा गायकवाड
Comments (0)
Add Comment