शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत जामनेर तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश..
जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे
उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकरजी, रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलासजी पारकर साहेब, रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोहर दादा पाटील,जामनेर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख श्रीकांत पाटील साहेब, यांच्या प्रयत्नांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेना भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड.ज्ञानेश्वर बोरसे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.प्रचारक राहुल चव्हाण, वाघारी येथील ग्रामपंचायत सदस्य ॲड.मिलिंद सपकाळे,लोंढरी येथील ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राठोड, प्रहार पक्षाचे जामनेर विधानसभा युवक क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळ,नरेंद्र धुमाळ, मनोज मिस्त्री,सुपडू गायके,यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे,शिवसेना जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी चोपडा, युवासेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील, विधानसभाक्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, युवासेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख ॲड. भरत पवार, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहन राठोड, सोशलमीडिया प्रमुख मुकेश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.