शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला जामनेर शहरात सुरुवात

आज दि.१०/११/२०२२(गुरुवार) रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार जामनेर शहरात शिवसेना व युवासेना तर्फे शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करुन शिवसेना रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ.मनोहर पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. विराज कावडीया यांनी युवासैनिकांना जास्तीत जास्त शिवसेना सभासद नोंदणीवर भर द्या असे आवाहन केले तर डॉ.मनोहर पाटील यांनी सांगितले की जामनेर शहराच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या चौकात शिवसैनिक बाक लाऊन सभासद नोंदणी करणार आहेत,जेणे करुन तळागाळातील सर्वसामान्य माणूस शिवसेनेला जोडला जाईल आणि उध्दव ठाकरे यांचे हात बळकट होतील. यावेळी युवासेना उपजिल्हायुवाधिकारी विश्वजित पाटील, तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे, उत्तर जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे, दक्षिण जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ,उपतालुका संघटक सुधाकर सराफ, उपतालुका युवा अधिकारी रोहन राठोड,माजी उपजिल्हा युवा अधिकारी भरत पवार, जामनेर शहर चिटणीस आनस खान,विद्यापीठ युवा अधिकारी प्रितम शिंदे, उपशहरप्रमुख कैलास माळी,दिपक माळी,विभाग प्रमुख खुशाल जाधव,राहुल पाटील, शाखाप्रमुख सुनील गायकवाड,शिक्षकसेनेचे शांताराम माळी यांच्या शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.त्याचप्रमाणे शिवसेना सदस्य होण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment