शेंदुर्णीत सणासुदीला सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर चा खोडसाळपणा. चुकीच्या नियोजनामुळे अपघातात दिवसभरात लक्षणीय वाढ.
जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे
शेंदुर्णी येथील सोयगाव रोड वरील अवघे एक किलोमीटर चा रस्ता बनवण्याचे काम चंग बांधून सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर यांनी गेल्या चार वर्षापासून हातात घेतले आहे .मात्र ते पूर्णत्वास नेण्याची कोणतीही मानसिकता सदर विभागाची दिसत नसल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी तून सोयगाव रोड वरील एक ते दीड किलोमीटर चे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांनी कोरोना काळाच्या आधीपासून हातात घेतले आहे. मात्र त्यांच्या कामाचा फायदा तर सोडाच उलट नुकसानच अधिक रहदारी करणाऱ्या वाहनांना व नागरिकांना होत आहे. सुरुवातीचे दोन वर्ष त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारी करता मोठमोठे खड्डे खोदून ठेवले कसेबसे करून मागील महिन्यात गटारीचे काम पूर्ण झाले. मात्र त्या गटारीचे पाणी त्याच रस्त्यावर सोडल्यामुळे त्या त्या रस्त्याला मोठ्या तलावाचे व गटारीचे स्वरूप प्राप्त झाले .त्यातून वाट काढणे शक्य होत नाही .पायी चालणाराचे कपडे चिखलाने भरून जातात .मोठ्या गाड्यांचा गटारीच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी स्वार तेथे दिवसभर पडत असतात मोठ्या गाड्या फसून जातात. त्याच रस्त्यावरून संबंधित विभागाचे अधिकारी, परिसरातील नेते, लोकप्रतिनिधी, वावरत असतात. दिवसभर त्यांचा राबता असतो .परंतु त्या कामात सुधारणा होऊन काम पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पक्षाची पुढाकार घेतलेला नसल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
जनतेचा रोष कमी होण्याकरता लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे नेते ,कार्यकर्ते व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदार यांनी रथउत्सवच्या अगोदर रस्ता पूर्ण न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संबंधित वाहतूकदार, रस्त्यावरून वावरणारे नागरिक यांनी यावेळी दिला आहे.