श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथीपर संकीर्तन सप्ताहाची सांगता

जामनेर /उपसंपादक -शांताराम झाल्टे श्रीसंत शिरोमणी तथा नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या ५२८ व्या पुण्यतिथीनिमित्त जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ तसेच श्रीसंत सेना महाराज बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा दि. २३/८/२२ मंगळवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री. अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची शहरातील जळगांव रोडवरील पुरुषोत्तम नगरातील नाभिक समाज मंदिरात सुरुवात करण्यात आली होती. त्याच प्रमाणे मुक्ताई संस्थानचे ह. भ. प. रावसाहेब भाऊराव सर यांच्या सुश्राव्य वाणीत काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली . आलेल्या भाविक भक्तगणांसाठी समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले होते.कोरोना रुपी दानवाचा बिमोड करण्यासाठी शासनाच्या आदेशाचे नियम पाळीत समाज मंदिराच्या प्रशस्त सभागृहात श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने १८ ते वयोगटातील सर्वांसाठी कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सीन त्याचप्रमाणे १२ वर्षांवरील मुला-मुलींना कार्बोव्हॅक्स व बुस्टर डोसचे लसीकरण केंद्र उभारण्यात आले होते.शहरातील महिला, नागरिकांनी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आपला सहभाग नोंदविला. त्याप्रसंगी वार्डाचे स्थानिक नगरसेवक सुहास पाटील यांचे कुठल्याही प्रकारचे सहकार्य तथा तत्परता व कामाची तळमळ पाहता समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी कौतुक करुन केलेल्या सहकार्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. त्यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, आतिष झाल्टे, वसंतराव साळुंखे, आत्माराम शिंदे, शिवाजी शिंदे, जयवंत पर्वते, नाना पवार, छोटू शिंदे, कैलास वाघ, अनिल पवार, रघुनाथ बोढरे, किशोर सैंदाणे, श्रावण बोढरे, पदाधिकारी, सदस्य यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी नाभिक समाज कर्मचारी संघटना, शहर नाभिक युवक व महिला संघटना, तालुका युवक संघटना, तसेच दुकानदार व नाभिक समाज जामनेर यांनी अनमोल सहकार्य करीत सिंहाचा वाटा उचलला आहे.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment