जामनेर | शांताराम झाल्टे
आज रोजी सुवर्णस्पर्श फाउंडेशन जाधववाडी फलटण मार्फत पंचगव्य आधारित उत्पादनाचे प्रशिक्षण महिलांसाठी घेण्यात आले.सध्या रासायनिक वापर केलेल्या वस्तू च्या वापरामुळे मानव जातीच्या आरोग्याची अपरिमित अशी हानी होत आहे.आणि पर्यावरणाची ही हानी होते कारण प्रत्येक उत्पादनांमध्ये रसायनाचा वापर आहे.आत्ता सेंद्रिय वस्तू वापरणे ही काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून सुवर्णस्पर्श फाउंडेशनने हे प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणामध्ये पर्यावरण पूरक,वैदिक सीड बॉल राखी, गोमय मातीपासून बनविण्यात येणार्या पण त्या, दंतमंजन बाम ,साबण ,शाम्पू ,फिनेल अत्तर, इको फ्रेंडली गणपती, इत्यादी उत्पादने शिकविण्यात आली यामध्ये कुठलाही रासायनिक पदार्थ न वापरता निसर्गातील गोष्टींचा आणि गाईपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा वापर केलेला आहे यावेळी प्रशिक्षक माननीय श्री एडवोकेट अशोक मुंडे सर आंबेजोगाई तालुका बीड( गोशाळा चालक) यांनी महिलांना बहुमूल्य असे प्रशिक्षण दिले तसेच त्यांनी सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी स्वतः 42 प्रकारची उत्पादने तयार केलेली आहेत त्यांनी महिलांना सेंद्रिय उत्पादनाचे महत्त्व पटवून दिलेले आहे या कार्यक्रमांमध्ये फलटणच्या बऱ्याच महिलांचा सहभाग होता या महिलांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात आले तसेच सुवर्णस्पर्श फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती शबाना पठाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या महिलांना थोड्याच दिवसात गृह उद्योग निर्माण करून देणार आहे आणि भविष्यात सेंद्रिय गोष्टीआणि विना रासायनिक पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.तरी फलटणच्या सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सौ रूपाली कुचेकर यांनी केले आणि संस्थेच्या सचिव सौ जयश्री पाटणे यांनी आभार व्यक्त केले आणि महिलांनी काळाची गरज ओळखून आर्थिकरित्या स्वतःच्या पायावर उभे राहणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व महिलांना पटवून दिले
सुवर्णस्पर्श फाउंडेशन ही संस्था फलटण तालुक्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी निरनिराळे उपक्रम राबवीत असते त्यातीलच त्यातीलच हा एक उपक्रम होता.आणि भविष्यात संस्थेच्या माध्यमातून नक्कीच महिला उद्योजिका निर्माण होतील संस्थेचे ध्येय आहे.