अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा समाजातील दुर्लक्षित “समाजरत्नांचा” होणार सत्कार
जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे
दि.१३ नोव्हेंबर २०२२
आज रोजी *अखिल भारतीय मराठा महासंघाच्या* वतीने जामनेर तालुका स्तरीय बैठक *जिल्हा उपाध्यक्ष श्री.अतुलभाऊ सोनवणे व तालुकाध्यक्ष श्री.राहुल भाऊ चव्हाण* यांच्या उपस्थितीत "सोमेश्वर महादेव मंदिर सोनबर्डी" या ठिकाणी पार पडली.
यावेळी समाजातील विविध विषयांवर चिंतन करण्यात आले. या बैठकीत जामनेर तालुक्यातील *मराठा समाजाचे - मराठा समाजासाठी* जामनेर तालुका म्हणून *"सामाजिक कार्यालय व सभागृह"* उभारण्यात यावे. याबद्दल सर्वानुमते तालुकास्तरीय संकल्प करण्यात आला.
त्यासोबत मराठा समाजातील दुर्बल, निराधार घटकांचा शोध घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे मनोधैर्य वाढावे व समाजाने या घटकांची दखल घ्यावी या कारणास्तव अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत या कार्यक्रमांची योजना निश्चित झालेली आहे.
त्यासोबतच समाजातील सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, औद्योगिक व शासकीय क्षेत्रातील मराठा समाजामध्ये नावलौकिक झालेल्या व समाजाची उंची डौलाने उंचावणाऱ्या *"समाज रत्नांचा"* यथोचित सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघ जामनेर तालुक्याच्या वतीने करण्यात येणार आहे असे आजच्या तालुका बैठकीत सर्वानुमते निश्चित करण्यात आलेले आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष- श्री.विनोद पाटील, श्री.संजय सपकाळ- सरचिटणीस,
श्री.विजय पाटील-सरचिटणीस,
श्री.संतोष चिंचोले-कार्याध्यक्ष,
श्री.अशोक पाटील-युवक अध्यक्ष
श्री.नवल पाटील-कोषाध्यक्ष,
श्री.ज्ञानेश्वर पाटील-शेतकरी,
श्री.रमेश पाटील-चिटणीस
सागर पाटील- युवक उपाध्यक्ष,
दिपक पाटील- शहर अध्यक्ष
मयुर पाटील- युवा सचिव
निखिल खंडारे- शहर युवा उपाध्यक्ष
दशरथ पाटील- युवा कार्याध्यक्ष
मंगेश इंगळे,विशाल सपकाळ, आदि मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.