अपंग धारकांना घरकुल, ५%निधी व पंचायत समिती मधील बंद पडलेली लिफ्ट लवकर चालू करण्यात यावी याबद्दल जागृत अपंग संघटनेच्या वतीने जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन.

जामनेर उपसंपादक/शांताराम झाल्टे विकलांग व्यक्तींना २०१६च्या कायद्यानूसार अपंग धारकांना घरकुल , ५% निधी लवकर देण्यात यावा व पंचायत समिती मधील बंद पडलेली लिफ्ट ताबडतोब चालू करण्यात यावी याबद्दल जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना जागृत अपंग संघटने मार्फत आज रोजी निवेदन देण्यात आले असून दिलेल्या निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास जागृत अपंग संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. जागृत अपंग संघटने चे अध्यक्ष विश्वनाथ काशिनाथ सुरळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे घर त्यांना देण्यात यावे.तसेच ग्रामपंचायत मधील मिळणारा ५% निधी हा राखीव असतो तरी ग्रामसेवक काही कारणे सांगून तो येणारा निधीचा लाभ मिळू देत नाही. अशा ग्रामसेवकांची मनमानी थांबविण्यात यावी कारणास्तव अंपगाना ५% निधी तात्काळ देण्यात येईल अशी मागणी निवेदनात केली जात आहे. नव्याने झालेली पंचायत समितीला बऱेच वर्षे पूर्ण झाले आहेत परंतु पंचायत समितीमधील लिफ्ट बंद पडलेली आहे त्यामुळे दिव्यांगांना वरच्या मजल्यावर जाण्यास त्रास होतो हा त्रास बंद होण्यात यावा व बंद पडलेली लिफ्ट तात्काळ चालू करण्यात यावी. याच प्रकारे प्रत्येक गावामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू असून आमच्या एकही दिव्यांगांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने दिव्यांगांना घरकुलाचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा अन्यथा आमच्या मागण्या येत्या २० तारखेपर्यंत मान्य न केल्यास आम्ही जागृत अपंग संघटनेमार्फत येत्या २२ डिसेंबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल.असा इशारा देण्यात आला. उपोषण करतेवेळी काही दिव्यांगांना हानी झाल्यास याला पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील. निवेदन देतेवेळी जागृत अपंग संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ सुरळकर, शहराध्यक्ष मोहन सुरवाडे, सदस्य सुधाकर शिंगारे आदि अपंग संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment