अमळनेर :- शहरातून साने नगर लगत असलेल्या बोरी नदीपात्रातून महादेव मंदिर जवळून सर्रास दिवसाढवळ्या जोरदार वाळू वाहतूक केली जात आहे. त्या ठिकणी मोठी खड्डे देखील पडली आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. लहान अँपे गाड्या पासून मोठे डंपर यांचा समावेश असून सदर वाळू वाहतूकदार कोणालाही घाबरत नसुन गल्लीबोळातुन सुसाट वाहने पळवत वाळू वाहतूक करत आहे. या परिसरात नागरिकांना वाहनांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत नागरिकांची बऱ्याच वेळा ओरड आली असून याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सर्रासपणे होणाऱ्या वाळू वाहतुकीवर आळा बसवावा अशी मागणी सानेनगर परिसरातून जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कार्यवाही मागणी करावी अशी मागणी होत आहे.