आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ अंतर्गत मकर संक्रांती – भोगी सणा मार्फत पौष्टिक तृणधान्य दिन ” साजरा.

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त तालुका कृषि अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांती - भोगी सण पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पर्यवेक्षिका निशा तेली यांनी पौष्टिक तृणधान्य पिकांची आहारातील महत्त्व त्याचे फायदे काय आहेत.पूर्वीपासून आपल्या आहारात असलेल्या या तृणधान्यांचा वापर शहरीकरणाच्या व पाश्चात्य अनुकरणाच्या ओघात कमी होत गेल्याचे कटू सत्य तर पिझ्झा, बर्गर आदी जंकफुडचा अवास्तव उपयोग वाढल्याचे चित्र आपल्या समोर आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा असे विकार वाढत आहेत. याचे दुष्परिणाम पाश्चिमात्य देशांच्या लक्षात आले आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी,लघुतृणधान्ये पिके वरई, राळा, राजगिरा आहारात असणे गरजेचे आहेत. तसेच प्रगतशील शेतकरी संजय मुळे यांनी संक्रांत -भोगी सणाला बाजरी भाकरीला पारंपारिक महत्त्व, हिमोग्लोबिन स्तर वाढविण्याकरिता बाजरी उपयुक्त , रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आणि निरोगी राहण्यासाठी बाजरी ( उष्ण गुणधर्मीय ) सेवन गरजेचे यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मंडळ कृषि अधिकारी धनश्री चासकर, मंडळ कृषि अधिकारी निता घार्गे,तसेच कृषि विभागातील सर्व कृषि पर्वेक्षक, कृषि सहाय्यक,समुह सहाय्यक,ए.टी.एम ( आत्मा ),व परीसरातील बचत गटाचे महिला शेतकरी व शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषि सहाय्यक सुनिल गायकवाड यांनी सुत्रसंचालन तर मंडळ कृषि अधिकारी निता घार्गे यांंनी आभार व्यक्त केले.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment