नाशिक:
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) ताब्यात घेतले होते. रात्री महिला संशयितेस अटक करण्याची पोलिसांची वेगळी पद्धत असून सूर्यास्त झाल्यानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम आहे. काल संशयित वीर यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले, बुधवारी पोलिसांत हजर होण्याची हमी घेत संशयित वीर यांना घरी जाऊ दिले. आज मात्र त्या पोलिस स्टेशनमध्ये आल्याच नाहीत असे पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले.
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून स्वीकारल्याच्या कारणातून नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. मात्र आज त्या पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्या नाहीत. या प्रकरणात अटक केलेल्या दोघांना नाशिकच्या न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.