इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

जळगाव दि.१७ प्रतिनिधी – ‘इनरव्हील डे’ निमित्त वृद्धाश्रमामधील आजी-आजोबांशी संवाद साधून त्यांच्यासोबत वेळ घालविता यावा यासाठी इनरव्हील क्लब जळगावचे अध्यक्ष उषा जैन यांच्यासह सदस्यांनी सावखेडा शिवारातील मातोश्री आनंदा आश्रमाला भेट दिली

. सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, प्रोजेक्ट चेअरमन नूतन कक्कड व क्लब सदस्यांची उपस्थिती होती. नुतन कक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली.

सर्व सदस्यांनी आजी-आजोबांसोबत भोजन केले. मातोश्री आनंदाश्रमाला एक महिना पुरेल एव्हढे किराणा साहित्य इनरव्हील क्लबच्या सदस्यांकडून देण्यात आले. प्रोजेक्टसाठी नूतन कक्कड यांच्या परिवाराचे अनमोल सहकार्य लाभले. यासाठी तृप्ती चौबे, तनुजा मोरे, मेघना जीवराजानी, ज्योस्ना रायसोनी, प्राजक्ता वैद्य, लीला अग्रवाल, साधना गांधी, सुनीता जैन, मीना लुनिया, डॉ. रितु कोगटा, रोहिणी मोरे, नीता जैन, राजश्री पगारिया, संध्या महाजन यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment