केवळ 15,000 रुपयांत तुम्ही होऊ शकता करोडपती; गुंतवणुकीचा भन्नाट फॉर्मुला

मुंबई : मृदुल गर्ग या 25 वर्षांच्या तरुणाला नुकतीच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली आहे. त्याला महिना 35 हजार रुपये पगार आहे. मृदुलनं आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात करतानाच रिटायरमेंट प्लानसाठी  विचार सुरू केला आहे. मृदुल जेव्हा 45 वर्षांचा होईल तेव्हा त्याला घर, मुलांचं चांगलं शिक्षण आणि चांगलं जीवन मिळावं यासाठी 5 कोटी रुपयांची गरज भासेल, असं त्याचं नियोजन आहे. याचाच अर्थ मृदुल नोकरीच्या माध्यमातून 20 वर्षांत 5 कोटी रुपयांचा निधी जमा करू इच्छितो. परंतु, त्यानं व्यावसायिक जीवनाला नुकतीच सुरुवात केली असून, गुंतवणुकीविषयी त्याला फारशी माहिती नाही. त्यामुळे कोणतीही जोखीम पत्करण्याची त्याची इच्छा नाही. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास मृदुल काहीसा घाबरत आहे.

20 वर्षांत बना करोडपती : पर्सनल फायनान्स प्लॅनर्सच्या म्हणण्यानुसार, मृदुल अजून तरुण आहे आणि 20 वर्षांत तो 5 कोटी रुपयांचा निधी जमा करू इच्छितो. परंतु, शेअर मार्केटच्या जोखमीपासून दूर राहणं तो पसंत करतो. त्यामुळे त्याने म्युच्युअल फंडात  गुंतवणुकीस सुरुवात केली पाहिजे. इक्विटी म्युच्युअल फंड  हा मृदुलसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मृदुल 20 वर्षांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून सुमारे 15 टक्के परताव्याची अपेक्षा करू शकतो. मृदुल गर्गला वार्षिक एसआयपी (SIP) स्टेप-अप वापरून त्याची मासिक एसआयपी वाढवत राहावी लागेल.

मृदुलने तातडीनं एसआयपी सुरू करावी आणि दर वर्षी पगारवाढ झाली की त्याच प्रमाणात एसआयपी वाढवावी, असं मार्केट तज्ज्ञांचं मत आहे. एसआयपीमध्ये वार्षिक वाढीसह मृदुलला 15 टक्के वार्षिक परतावा  मिळू शकतो. गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळवण्यासाठी मृदुलला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा  विस्तार करावा लागेल.

15*15*15 चा फॉर्म्युला : मृदुलला 20 वर्षांत सुमारे 5 कोटींचा निधी जमा करायचा असेल, तर त्याला 15*15*15 चा फॉर्म्युला (Formula) वापरावा लागेल. म्युच्युअल फंडात 15*15*15 हा फॉर्म्युला मोठं आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरतो. मृदुलला 15 टक्के परताव्यासाठी 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये गुंतवावे लागतील. यातून तो त्याचं 5 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो.

म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटर : आता 5 कोटींचा निधी कसा जमा होईल आणि हा फॉर्म्युला त्यासाठी कसा फायदेशीर ठरेल हे पाहू या. 15 टक्के वार्षिक परताव्याची अपेक्षा ठेवून मृदुलला दरमहा 15,000 रुपये गुंतवावे लागतील आणि त्याला हे पैसे 20 वर्षांसाठी गुंतवावे लागतील. अशा प्रकारे त्याच्याकडे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी जमा होऊ शकतो.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment